MAKE AN APPOINTMENT
×
×

Infolead Foundation

We’d love to hear from you. Send us your questions, valuable feedback and requests.

×

NEWS & UPDATE

Read Infolead Foundation news and most recent updates.


इन्फोलीड फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मिहेर पांडे

पिंपरी, ता. २५ : इन्फोलीड फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मिहेर पांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी विराज यादव यांची निवड करण्यात आली आहे. सेक्रेटरीपदाची जबाबदारी रवी पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या फाऊंडेशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही निवड बिनविरोध केली आहे. मिहीर पांडे म्हणाले, ‘‘फाउंडेशनच्यावतीने ग्रामीण भागातील युवक-युवतींना आयटी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासंदर्भात उपकम राबविण्यात येणार आहेत. आयटी क्षेत्रातील संधी सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. तंत्रज्ञान वाढत असले तरी; त्याचा योग्यरीत्या वापर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. याच बरोबर गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्यावतीने मदत करण्यात येणार आहे.’’ Click here


शिकणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी ‘इन्फोलिड’चा पुढाकार, विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पुणे: शिक्षणामुळेच आपल्या कुटुंबासोबतच देशाची प्रगती होत असते. परंतु काही वेगवेगळ्या अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण होतो. अशावेळी समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज असते. हेच काम इन्फोलिड फाउंडेशनच्यावतीने करण्यात येत आहे. इन्फोलिडकडून मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. स्वप्न पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी इन्फोलिड फाउंडेशनकडून मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना लागणार्‍या शैक्षणिक सुविधा पुरवण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांच्याकरिता वॉशरुम बांधून देण्यात आले आहे. याच बरोबर शैक्षणिक उपक्रमाच्या मदतीकरिता फाउंडेशन पुढाकार घेत असून शाळेमध्ये नुकताच एक कार्यक्रम देखील पार पडला. Click here